Shivpremi Mitra Mandal

चला आपण आपला भारत मजबूत बनवूया!

You May join here as a Member

Recent Photos

Recent Videos

174 views - 0 comments
127 views - 0 comments
177 views - 0 comments
282 views - 0 comments

Arcade

Recent Blog Entries

Recent Forum Posts

No recent posts

Testimonials

WELCOME!

Dear Visitor,

Shivpremi Mitra Mandal is an Non-Profit Organization -NGO Trust.  Established in the year 1976 to celebrate Shree Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti at Mumbai.  The organization is registered in the year 1998.  Successfully achiving Aims & Objectives.

1) Youth Co-operation

2) Religious and National Celebrations

3) Arts, Sports & Education

4) We help Public Welfare Organization

5) We do Socialwork Programs

6) We work on Educational Development

7) We provide Educational & Medical Help

8) We offer Educational Scholership & Pramotions.

9) We help Unemployed  and  Self Employed Youth.

We thankful to 'you all' who has provided co-operation to fulfil Aims and Objectives till today.  We expect more co-operation here onward to work with us.  We accept Donations by Cheques drawn on Shivpremi Mitra Mandal.  To work with us in socialwork programm we also accept Monthly/Yearly contributions.  Thank you once again to visit our website.

Welcome!

For Shivpremi Mitra Mandal

Shamsunder Gawade

(Chairman)

 

नमस्कार, 

शिवप्रेमी मित्र मंडळ ही एक सामाजिक सेवाभावी ना-नफा संघटना आहे.  ही संघटना साल 1976 साली श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी स्थापन करण्यात आली.  ही संघटना साल 1998 साली धर्मादाय आयुक्तांच्या वरळी, मुंबई येथील कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आली.  संस्था आपली ध्येय्ये आणि उद्धीष्टये योग्य प्रकारे पुर्ण करत आली आहे.

1) युवकांस सहकार्य भावनेतून एकत्र आणणे.

2) धार्मिक व राष्ट्रीय सण साजरे करणे.

3) कला, क्रीडा आणि शिक्षण

4) सामाजीक संस्थांना त्यांच्या कार्यात मदत करणे.

5) सामाजीक उपक्रम राबवणे.

6) शैक्षणीक विकासाची कामे करणे.

7) गरजवंतास शैक्षणीक आणि वैद्यकिय मदत पुरवणे.

8) आम्ही शैक्षणीक शिष्यवृ्त्ती देतो.

9) आम्ही व्यवसाय आणि नोकरी साठी मदत करतो. 

 
वरील ध्येय्य आणि उद्दीष्टये पुर्ण करण्यासाठी आम्हाला आजपर्यंत अनेकांचे सहकार्य लाभत आले आहे.  आम्ही आपले आभारी आहोत.  यापुढे ही असेच सहकार्य द्यावे ही आपणांस आग्रहाची विनंती.  आपण आपला देणगी धनादेश मंडळाच्या नावे देऊन आमच्या सत्कार्यात सहभागी होऊ शकता.  मंडळाच्या सत्कार्यात सहभागी होण्यासाठी आपण मासिक/वार्षीक वर्गणी देवू शकता.

     आपण या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद,

आपले कृपाभीलाषी,

शिवप्रेमी मित्र मंडळ यांसाठी,

  शामसुंदर गावडे (अध्यक्ष)

शिवप्रेमी मित्र मंडळ

पुर्वइतिहास:(१९७६-१९९८) श्री. श्यामकांत आरोळकर एक सर्वसामान्य गरीब तरूण, परिस्थिती अतिशय गरीब.  घरात कुटूंबाची जबाबदारी.  दोन बहिणी व स्वत:.  आई वडीलांचे देहावसान झाले होते.  साधारण याच काळात शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली होती.  बाळासाहेब ठाकरे हे या पक्षाचे संस्थापक आणि त्यांच्या प्रेरणेने तरुण युवक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रेरीत होवून शिवसेनेचे काम करीत होते आणि या पक्षाद्वारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जावू लागली.  याचवेळी श्री. श्यामकांत आरोळकर या तरुण तडफदार व्यक्‍तीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी विभागात साजरी करायचे ठरवले यासाठी त्यांनी विभागातल्या वयाने अगदी लहान लहान मुलांना सोबत घेतले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास प्रेरीत केले.  आम्ही लहान लहान कच्चेबच्चे ज्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जाणिवही नव्हती असे बालगोपाळ यात सामिल झालो आणि पहिली शिवजयंती साल १९७६ साली जोरणबाग, असल्फा व्हिलेज, घाटकोपर (प.) येथे आमच्या आईवडिल आणि शेजारी यांच्याकडून वर्गणी जमा करुन लहानसा फोटो लावून सुरू केली.  आम्हा लहान मुलांमध्ये एक वेगळा आनंद होता, हुरुप होता, जोश होता.  मोठी मंडळी देखिल मदत करत होती.  या वेळेस उद्देश फक्‍त एकच होता - श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे.

मुलांच्या कार्यक्रमाला मोठी माणसे देखील साथ देत होती. काळ बदलत होता तसे विभागात लोक बदलत होते. मुले मोठी होत होती. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत होती आणि मुलांच्या स्वभावांत देखील बदल घडत होते.  मतप्रवाह बदलत होते तसा विचारांत मतभेद वाढत होते.  हा परिणाम होता सभोवारच्या परिस्थितीचा.  या सर्वांचा परिणाम वर्गणी जमा करताना दिसून येत होता.  मुलांचा जमाव म्हणजे “बालगोपाळ” म्हणून “बालगोपाळ मित्र मंडळ” हे नाव आपोआपच मिळाले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होवू लागली.  दरम्यान श्री. श्यामकांत आरोळकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले.

शिवजयंती जवळ येवू लागली की मुले एकत्र जमत आणि कार्यक्रमांची आखणी करत.  वर्गणी व देणगी जमा करण्यापासून अतिरीक्‍त मदत आणि कार्यक्रम यांची जमवाजमव व आखणी होत असे.  यात हिरहिरीने भाग घेण्याचे काम कु. अशोक बेडेकर हा मुलगा पुढाकार घेवून करत असे.  या सर्व कार्यक्रमांत त्याचा वाटा नेहमी मोठ्या प्रमाणात होता.  हा मुलगा शिवसेना या पक्षाचे कार्य मोठ्या जोमाने करत असे.  तो एक कट्टर शिवसैनिक होता.  या मुलाचीच काय विभागातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्यच होती.  पण काळानुरुप परिस्थितीत बदल होत होते त्यानुसार माणसांचे स्वभाव बदलत होते.  या सर्वाचा परिणाम दिसून येत होता.  मुलांच्या संघटनेत वाद निर्माण होत होते.  संस्थापकाचे निधन झाले होते. म्होरका आपोआप बदलला होता.  कु. अशोक बेडेकर हा बालगोपाळांचे नेतृत्व करत होता.  शिवजयंती उत्सव जवळ आला होता. वर्गणी गोळा करायची होती.  वर्गणीचा हिशोब होत नव्हता.  जमा केले खर्च झाले असे चालू होते. मुले मोठी होत होती.  शाळेत शिक्षण घेत होती. हिशेब विचारला जावू लागला.  विभागात शिक्षणात अग्रेसर मुलांपैकी या बालगोपाळांत एक कु. शामसुंदर गावडे होता.  त्याने हिशेबावर विचारणा केली असता सर्वांनी त्याला खजिनदार बनवण्याचे ठरवले.  मंडळाची संघटना होत होती.  सभासद, पदाधिकार, कार्यकर्ते, कार्यक्रम ठरत होते.  मुले मोठी झाली होती.  मंडळाच्या नावाचा परिणाम वर्गणीवर होत होता आणि त्याच नावाचे दुसरे मंडळ देखिल विभागात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि श्री हनुमान जयंती उत्सव साजरे करत होते.  या कारणास्तव नावात बदल आवश्यक होता म्हणून नाव बदलण्याचे ठरले.  शिवप्रेमी नाव सुचवण्यात आले यावर कु. शामसुंदर गावडे यांने मंडळाचे नाव शिवप्रेमी मित्र मंडळ असावे असे सांगितले पण त्यावर आक्षेप घेण्यात आला.  काही मुलांचा एक वेगळा गट निर्माण झाला होता.  हा गट लहान खेळाडू मुलांचा होता त्यांनी सांगितले मंडळाचे नाव शिवप्रेमी क्रिडा मंडळ ठेवण्यात यावे.  यावरुन मुलांच्या यामंडळात दोन गटाची निर्मीती झाली.  या वादात मंडळाचे कामकाज चालूच होते.  खजिनदार कु. शामसुंदर गावडे असल्याने आता हिशोब होत होते यामुळे वादाचे कारण लक्षात येवू लागले होते.  पण थेट कोणावरही आरोप करता येत नव्हते.  याच काळात मित्र मंडळात श्री. बाबूराव म्हात्रे नामक व्यक्‍ती दाखल झाली होती.  ही व्यक्‍ती वयाने मोठी होती त्यामुळे सर्वजन त्यांना मार्गदर्शक समजू लागले.  आता सर्व कामे दोन व्यक्‍तीच्या अधिकाराखाली होवू लागल्या.

अनेक मुले कार्यक्रमाला जमा होत होती.  थाटामाटात उत्सव साजरा होत होता.  हिशोब होत होते. सभा होत होत्या. त्या काळात रात्री चित्रपट प्रदर्शन हा करमणूकीचा भाग असे. विविध मंडळे आपल्या कुवतीनुसार चित्रपटांचे प्रदर्शन करत.  हि चित्रपटे प्रबोधनार्थ असत. एका रात्रीत एक, दोन किंवा तिन चित्रपटांची चंगळ असे.  पण आम्ही आमच्या क्षमतेनुसार केवळ एकच चित्रपटाचे प्रदर्शन करीत होतो. मुलांचे विविध कार्यक्रम होत होते.  धावणे, संगितखुर्ची, रेकॉर्डडान्स ई. कार्यक्रम पारपडत होते.  शिवजयंती जवळ आली कार्यक्रम ठरवतांना इतर मंडळांच्या अनुकरणाने प्रेरीत होवून काही सभासदांनी दोन चित्रपटांचा आग्रह धरला असता पुन्हा दोन गटात वाद झाला.  आता गटबाजीचे प्रमाण जास्त वाढले होते.  या गटबाजीचे कारण होते एक चित्रपट की दोन.  विरुद्ध गटाचे म्हणणे होते की, एकच चित्रपट दाखवावा.  म्हणणे खर्चाच्या दृष्टीने रास्त होते पण चित्रपट देणगीच्या स्वरुपात मिळणार असल्याने तो दाखवणे गरजेचे होते.  या कारणास्तव दोन चित्रपट दाखवले जाणार होते तेच विरुद्ध गटाला मान्य नव्हते.  त्यांचे म्हणणे होते की, देणगी पैश्यांच्या स्वरुपात स्विकारायला हवी होती.  पण त्यावर्षी देखिल कार्यक्रम थाटामाटात पार पडले.  अशा प्रकारे दरवर्षी कार्यक्रम होत होते.

पुन्हा शिवजयंती आली. सभा घेण्यात आली.  दोन गटात वाद धुमसत होते यात अध्यक्षपदी कु. शामसुंदर गावडे असावेत यावर सर्वांचे एकमत झाले.  त्यावर्षी देखील कार्यक्रम अगदी नेहमीपेक्षा जास्त थाटामाटात पार पडले.  याचा परिणाम पुढच्यावर्षी झाला.  लोकांचा प्रतिसाद वर्गणी आणि देणगीच्या स्वरुपात दिसून आला.  नेहमीपेक्षा जास्त वर्गणी जमा झाली व शिल्लक चांगली उरली.  मंडळाची प्रगती होत होती पण गटबाजी देखील वाढत होती.  याच कारणास्तव कु. शामसुंदर गावडे कारभार केवळ शिवजयंती पुरता मर्यादीत पहात होते.

पुन्हा शिवजयंती जवळ आली. सभा झाली.  यावेळेस मात्र कार्यकारी मंडळ बदलण्याचे ठरले विरुद्ध गटाकडे शिवजयंतीचा कार्यक्रम सोपवण्यात आला.  यामुळे कु. शामसुंदर गावडे यांची जबाबदारी कमी झाली.  त्यावर्षी वर्गणीची पुर्वीची शिल्लक व नवी जमा यामुळे कार्यक्रम चांगले झाले पण पुर्वीचा रंग नव्हता.  हिशोबात गैरप्रकार दिसून आले.  असे काही वेळ चालू राहिले.  पुन्हा शिल्ल्क घटली व कु. शामसुंदर गावडे यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली व शिवजयंती पार पडली.  कु. शामसुंदर गावडे नाराज होते कारण व्यवहारात गोंधळ दिसत होता.  आता कु. शामसुंदर गावडे यांनी मंडळापासून दुर राहण्याचे ठरवले आणि दोन वर्षे शिवजयंती चालूच होती.  पण, पुर्वीचा जोम कमी झाला होता.  शिवजयंती होत होती.  दुराचार वाढला होता अशा वेळेत मंडळातल्या दोन व्यक्‍ती कु. सखाराम सरमळकर व कु. शशिकांत बडबे, कु. शामसुंदर गावडे यांच्याकडे गेले त्यांनी मंडळ अडचणीत व बरखास्त होण्याच्या मार्गावर असल्याचे कळवले.  कु. शामसुंदर गावडे यांनी त्यावर नाराजी दर्शवली.  पण, कु. सखाराम सरमळकर व कु. शशिकांत बडबे यांनी विणवणी केली.  यावर कु. शामसुंदर गावडे यांनी अट घातली होती ती त्यांच्या लक्षात आणुन दिली.  मंडळ रजिस्टर करून नव्याने सुरु करत असाल तर मी शामसुंदर गावडे नव्या जोमाने मंडळाची नवी आखणी करण्यास तयार आहे असे सांगण्यात आले.  यावर ते तयार झाले.  मंडळ जवळ जवळ खालसा झाले होते.  संपले होते.  कोणिही मंडळात काम करेनासे झाले होते.

श्री. शामसुंदर गावडे यांनी मंडळातली गटबाजी विसरुन योग्य माणसांची निवड केली.  मुले वयाने आता मोठी होती.  काही पोक्‍त व्यक्‍तीची देखिल निवड केली व मंडळ रजिस्टर केले.  यावेळेस फक्‍त श्री. सखाराम सरमळकर, श्री. शशिकांत बडबे, श्री. शामसुंदर गावडे यांनी मंडळ उभारण्याचे कार्य केले.  मंडळ नव्याने “शिवप्रेमी मित्र मंडळ” या नावाने प्रमुख संस्थापक श्री. शामसुंदर गावडे व इतर श्री. शशिकांत बडबे, श्री. सखाराम सरमळकर इ. ने कार्यरत झाले आणि एक कायदेशीर संस्था निर्माण झाली.  ही संस्था एक आता चांगली विश्वस्त संस्था आहे.